ऑनलाईन मद्यविक्रीचे वृत्त खोडसाळपणाचे : बावनकुळेंचे घुमजाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

सध्या ऑनलाइन खरेदीचा जमाना आहे. काही ग्राहकांनी मद्यविक्री ही देखील ऑनलाईन मंजूर करावी असे प्रस्ताव शासनाला दिले आहे. या संदर्भात अनेक अर्ज शासनाकडे प्रलंबित आहेत. कायद्यानुसार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देणे शक्य नसून तो एक गुन्हा आहे. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट मत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय यासंदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त म्हणजे खोडसाळपणा आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’433e7c2c-d036-11e8-98a8-a35d25a9809b’]

मद्यविक्री आता ऑनलाइन होणार, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारवर टीकेचा भडीमार सुरू झाला होता. सोशल मीडियावर तर राज्य सरकारच्या अक्षरशा पिसे काढण्यात आली. अखेर असा कोणताही निर्णय शासन घेणार नाही, असे स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. बावनकुळे यांनी म्हटले की, सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री ही नियमानुसार केवळ शासनाने मंजूर केलेल्या दुकानातूनच करण्यात येते. यात कोणताही बदल करण्याचा शासनाचा मानस नाही. मद्यविक्री ऑनलाईन करण्यात येत असल्याबद्दलचे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेले वृत्त हे खोडसाळ आहे. ऑनलाइन किंवा अन्य मद्यविक्रीला प्रोत्साहित करणे हेदेखील कायद्याला धरून नाही. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनातर्फे कोणताही विचार नाही. याबाबतचे वृत्त खोडसाळ असून राज्य सरकारचा तसा विचार करत नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B00JJOBKS4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’540ba276-d036-11e8-ae05-4d07c1d25960′]

उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणारे अपघात टाळणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. नशेत गाडी चालवून होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. यात अनेक जण मृत्युमुखी पडतात. जशा इ-कॉमर्स वेबसाइट असतात तशाच माध्यमातून जशी भाजी, फळे घरी येतात तशी दारूही घरपोच येईल. दारु ऑनलाइन मागवण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल. तर सरकारच्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना उच्च न्यायालयातले वकील श्रीरंग भंडारकर यांनी म्हटले होते की, ड्रंक ॲन्ड ड्राइव्हचे गुन्हे यामुळे कमी होतीलच, शिवाय जर अशी ऑनलाइन सेवा सुरू झाली तर युवकांसाठी रोजगारही वाढेल. शिवाय ग्राहकांनाही चांगल्या प्रतिची दारू घरपोच मिळेल. मात्र, आता मंत्री बावनकुळे यांनीच हे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.

बनावट चकमक प्रकरण : मेजर जनरलसह ७ लष्करी अधिकाऱ्यांना जन्मठेप