‘भारत’ चित्रपटामधून नोरा फतेहीचा ‘डान्सचा जलवा’ प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ याची वाट सर्व चाहते पाहत आहे. भारत चित्रपटात सलमान वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. आपल्या डान्सचा जलवा दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेही सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. तिने ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर डान्स करुन चाहत्यांना वेडे केले आहे. तिच्या डान्सचे चाहते दिवाने आहे. पुन्हा एकदा तिचा जलवा चाहत्यांना पहावयास मिळणार आहे.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, नोरा ‘भारत’ चित्रपटात कोणतेही आयटम सॉंग करणार नाही तर सिच्युएशनल गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात तिचे सलमान खानसोबतचे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ‘तुर पेया’ हे आयटम सॉंग नसून सिच्युएशनल गाणे आहे.

याबाबत नोरा म्हणाली की, ‘तुर पेया’ हे आयटम सॉंग नसून सिच्युएशनल गाणे आहे. या चित्रपटात माझी छोटीशी भूमिका आहे. पण, प्रेक्षकांना या चित्रपटातील माझा अभिनय लक्षात राहिल. सलमान खानसोबत चित्रपटाचा भाग होणे म्हणजे सिनेइंनस्ट्रीमध्ये खूप मोठी बाब आहे.

नोरा पुढे म्हणाली की, एक प्रोजक्ट अमेज बदलू शकत नाही. माझ्याकडे यावर्षी काही प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये मी रसिकांना डान्स व म्यूझिकपेक्षा काहीतरी वेगळे करताना दिसणार आहे.

नोरा फतेहीला आयटम नंबरसाठी सगळीकडे ओळखले जाते. तिला प्रेक्षकांमधून तिची इमेज बदलायची आहे. नोरा फतेही ‘भारत’ नंतर ‘बाटला हाऊस’, ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटात झळकणार आहे.

भारत चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.