‘त्या’ कार्यक्रमात सहभागी होऊन अमित शाह झाले ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. परंतु, ते आले तेव्हा त्या कार्यक्रमात न्यायाधीश नसल्याने अमित शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

आप की आदालत या कार्यक्रमात न्यायलयाप्रमाणे न्यायाधीश बसवलेले असतात. त्यांची तेथील भूमिका काहीच नसते. परंतु, कार्यक्रमाची रुपरेषाच तशी आहे की, त्यात न्यायधीश असतात. परंतु, नेमके अमित शाह यात सहभागी झाले तेव्हा तेथे न्यायाधीश नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

अमित शाह यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी विरोधकांवरही सडकून टीका केल्याचे दिसून आले. अमित शाह यांनी अखिलेश यादव यांच्यापासून ते कपिल सिब्बल आणि अन्य नेत्यांवरही हल्लाबोल केला. एअर स्ट्राईकमध्ये मृत पावलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती. त्यावरही अमित शाह यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “कपिल सिब्बल यांनी बालाकोटला गेलं पाहिजे.” असे ते म्हणाले. यावेळी निवडणूकीच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “देशाची सुरक्षा हा मुख्य मुद्दा असला पाहिजे. देशाची सुरक्षा कोण करणार हे लोकांना जाणून घ्यायचं आहे” असंही ते म्हणाले.

दरम्यान, अमित शाह या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर, प्रसिद्ध कॉमेडिअन कुणाल कामरा यांनी या कार्यक्रमातील एक स्क्रिनशॉट ट्विटरवर पोस्ट करत त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटले की, “अमित शाह जनता की आदालतमध्ये आले आहेत आणि मी असा पहिलाच एपिसोड पाहत आहे ज्यामध्ये न्यायाधीशच नाहीत.”

यापूर्वी एकदा असे झाले होते की, कार्यक्रमात न्यायाधीश नव्हते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव एकदा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हाही न्यायाधीश नव्हते. महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमात न्यायाधीश उपस्थित नसणे कार्यक्रमाचा भाग होता, पण तरीही सोशल मीडियावर चर्चा सुरूच असल्याचं दिसत आहे.