बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्धा गेस्ट लिस्टमधून गायब !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. आता दोघं लग्न करत आहेत. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. अलिबागच्या मेंशन हाऊसमध्ये वरुण-नताशा लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. 24 जानेवारीपर्यंत वरुण ( varun dhawan) आणि नताशा यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम चालणार आहेत. कोरोनामुळं काही मोजक्याच लोकांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. लग्नातील पाहुण्यांची यादीही उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूड रिपोर्टनुसार, पहलाज निहलानी आणि गोविंदा यांना लग्नपत्रिका पाठवलेली नाही. ही दोन नाव अशी नाहीयेत जी या कुटुंबाच्या क्लोज आहेत. बोनी कपूर ज्यांची मुलं वरुण धवन आणि त्याच्या कुटुंबाच्या खूप क्लोज आहेत त्यांना लग्नाला इन्वाईट केलेलं नाही.

सूत्रांच्या हवाल्यानं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरला लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. अनिल कपूरच्या कुटुंबातून कुणालाही बोलवण्यात आलेलं नाही.

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा जो वरुणच्या आईचा नातावेईक लागतो त्याला आमंत्रण मिळालं आहे. करण जोहर आणि शशांक खेतान यांनाही लग्नात बोलवण्यात आलं आहे. एक शॉकिंग खुलासा असा आहे की, जी गेस्ट लिस्ट समोर आली आहे त्यात बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याचं नाव नाहीये.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे