IPL 2020 : कर्णधार बदलण्याची गरज नाही, चांगल्या ‘फिनिशर्स’चा शोध घ्या, विरेंद्र सेहवागनं दिला RCB ला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल टी-20 ( IPL T – 20) क्रिकेट ( Cricket) स्पर्धेत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये ( Delhi Capitals ) फायनलचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कधीही विजय न मिळवलेला विराट कोहलीचा ( Virat Kohli) आरसीबी ( RCB) संघ देखील बाहेर पडला आहे. पहिल्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या संघाचा ६ गडी राखून पराभव करीत आव्हान संपुष्टात आणले. त्यानंतर विविध खेळाडूंनी यावर आपली प्रतिक्रया व्यक्त केलॆच. माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virendra Sehwag) याने मात्र पुढच्या वर्षीही कोहलीकडेच नेतृत्व सोपवायला हरकत नाही. कर्णधार बदलण्याची गरज नाही, असे विपरीत वक्तव्य केले आहे.

गौतम गंभीर याने विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत १२ वर्षाच्या विराटच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता का आले नाही,असा थेट सवाल केला होता. तथापि आरसीबी कोहलीकडे नेतृत्व कायम ठेवेल, असा ठाम विश्वास सेहवागने ‘क्रिकबझ’या वेबसाईटशी बोलताना व्यक्त केला. पुढच्या सत्रात संघाने कामगिरी उंचावण्यासाठी काय करायला हवे, याचा विचार केलेला बरा. माझ्यामते फिनिशर्सची संघाला गरज असल्यामुळे युवा खेळाडूंचा शोध घेत संघाची ताकद वाढवण्यावर भर देणे योग्य राहील,असे सेहवागने आपले मत व्यक्त केले.

याविषयी अधिक बोलताना सेहवाग म्हणाला, की कर्णधार हा संघाची जबाबदारी सांभाळणारा नेता असतो. तो देशाचे नेतृत्व करीत असताना निकाल देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो. वन डे टी-२० आणि कसोटी सामने जिंकण्यात विराटने मोलाचे प्रयत्न केलेले आहेत. तथापि आरसीबीचे नेतृत्व करताना विराटला कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, विराटची कर्णधारपदावरून उचलबांगडी करणे गरजेचं नसल्याचे देखील सेहवागने यावेळी म्हटले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने संघाला बळकटी आणण्यासाठी युवा फिनिशर्स संघात कसे आणता येतील, याकडे लक्ष द्यायला हवे. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या संयुक्त प्रयत्नातून पुढील सत्रात आरसीबीला घवघवीत यश मिळू शकेल, असा विश्वास देखील यावेळी सेहवागने व्यक्त केला.