मराठा आरक्षणासाठी घटनादुरूस्तीची गरज नाही- नारायण राणे

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

मराठा आरक्षण द्यायची इच्छा असेल तर केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी असे मत राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मागील काही दिवसापूर्वी व्यक्त केले होते. तसेच सरकारने तशी तयारी दर्शवल्यास आपण विरोधकांना त्याची गरज समजावून सांगू असेही त्यांनी म्हटले होते. मात्र नारायण राणे यांनी या मुद्द्यावर  दुरूस्तीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’588a677d-949a-11e8-b209-1930942375b6′]

तसेच आंदोलनावरुन राज्याची परिस्थिती पाहता राणेंनी मराठा बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे. येत्या तीन महिन्यात हा प्रश्न निकाली लागणार असून, हिंसा करुन नका, कारण त्याच्या माध्यमातून काहीही साध्या होणार नाही. असे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे कारण राजकीय पक्ष असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला. शरद पवार हे राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते त्यांनी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागतो आहे. हीच बाब लक्षात घेऊन मराठा बांधवांनी आंदोलन मागे घ्यावे असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.