1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस त्यांच्याजवळील डिव्हाइसव्दारे तपासणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आता वाहन चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (Driver’s license),
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (registration certificate), इन्श्युरन्स(insurance), पोल्यूशन सर्टिफिकेट ( PUC), सारखी कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्यकता असणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत एक अ‍ॅक्ट तयार करून नोटिफिकेशन जारी केले आहे, जो एक ऑक्टोबरपासून लागू होईल. केंद्र सरकारने(Central government) म्हटले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची देखरेख एक ऑक्टोबरपासून माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे करता येईल.

मंत्रालयाने राज्य परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलिसांना वाहन चालकांकडून कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले आहे. त्याऐवजी एक सॉफ्टवेयर विकसित करण्यात येत आहे, ज्याद्वारे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी किंवा प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याला गाडीचा नंबर आपल्या मशीनमध्ये टाकून स्वतालाच सर्व कागदपत्रांची तपासणी करावी लागेल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकार्‍यानुसार, यासाठी एक नवीन सॉफ्टवेयर तयार होत आहे. हे सॉफ्टवेयर निर्धारित तारखेपासून परिवहन सॉफ्टवेयरशी जोडले जाईल. यामध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर त्या वाहनाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी होऊ शकते.

वाहन चालकांचा कोणता फायदा होणार

– अ‍ॅक्टनुसार, एखाद्या पोलीस कर्मचार्‍याकडे तपासणी उपकरण नसेल, तर तो स्मार्टफोनवर सॉफ्टवेयर डाऊनलोड करूनवाहनाचे कागदपत्र तपासू शकतो. स्वता तपासणी करण्याची जबाबदारी असेल.

– वाहन मालकाला कागदपत्र नाहीत म्हणून जाब विचारता येणार नाही.

– जर गाडीचे चलान झाले आणि वाहन मालकाने चलान भरले नाही तर, तर परिवहन संबंधी टॅक्स जमा करावा लागेल.

– टॅक्स न भरण्याच्या स्थितीत वाहन मालक गाडी विकू शकणार नाही, आणि ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकणार नाही.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये विविध दुरूस्त्या केल्या होत्या. या सुधारणांद्वारे पोर्टलने ई-चलान आणि वाहनांची कागदपत्रांच्या देखरेखीवर अंमबजावणी केली जात आहे. हा बदल मोटर वाहन कायद्याच्या चांगल्या अंमबलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी करण्यात आला आहे. आयटी सेवा आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीच्या वापराने देशात ट्रॅफिक नियम चांगल्याप्रकारे लागू करण्यास मदत होईल. सोबतच ड्रायव्हर्सची पिळवणूक कमी करता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like