जितकी गाडी चालवाल तितकाच हप्ता भरा, ड्रायव्हिंगसाठी नवी इश्यूरन्स पॉलिसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे. म्हणूनच आता वाहन निर्मात्या कंपन्यांनी व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्या वाहनांवर सूट आणि ऑफर्स दिल्या आहेत. त्यातच आता विमा कंपन्यांनीही नवीन इंश्योरन्स पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून वापरकर्ता ज्या दिवशी गाडीचा वापर करेल, त्यादिवशीचाच प्रीमियम त्यास भरावा लागेल.

एडलवाइस स्विच (Edelweiss SWITCH) आणि टाटा एआयजीची (Tata AIG) ऑटो सेफ ( Auto Safe) ने अशा प्रकारची पॉलिसी बाजारात आणली आहे. त्यासाठी ग्राहकांना रेग्युलर मोटर इंश्योरन्स पॉलिसीमध्ये कार मॉडेलच्या आधारे प्रीमियमचं पेमेंट करावं लागत. मात्र, आता पॉलिसी होल्डर्स आपला प्रीमियम कस्टमाईज करू शकतात.

एडलवाइस जनरल इंश्योरन्सने Edelweiss SWITCH अ‍ॅपद्वारे ऑटो विमा पॉलिसीची घोषणा केली आहे. ही अनोखी विमा योजना वापरकर्त्यांना केवळ वाहनाच्या उपयोगाच्या दिवसाचा प्रीमियम भरण्यासाठी आहे. ही विमा योजना वाहन मालकांना जेव्हा हवे तेव्हा पॉलिसी चालू आणि बंद करण्याची परवानगी देते.

इंश्योरन्स ऑन-ऑफवर आधारित असेल कव्हर –

कंपनीने सांगितल्यानुसार, इंश्योरन्सची तुलना चालकाचे वय आणि अनुभवाच्या आधारे करण्यात येते. वापरकर्ते या मोबाइल अ‍ॅपचा वापर करुन आपल्या पॉलिसी कव्हरला ऑन आणि ऑफ करण्यासाठी करु शकतील. अर्थात ज्या दिवशी गाडी चालवणार असचाल त्यादिवशी ऑन आणि न चालवल्यास पोलीस ऑफ करता येईल.

त्याचप्रमाणे, जेव्हा पॉलिसी बंद असेल तेव्हा अचानक आग चोरीसारख्या घटना घडल्या तर संपूर्ण वर्षात वाहनाला पॉलिसी कव्हर मिळेल. मात्र, अपघाती नुकसानीत, जेव्हा विमा ऑन असेल, तेव्हाच पॉलिसीचा लाभ भेटू शकतो.