मला कोणी विचारत नाही ; विखे पाटील यांची खंत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला ऑफर दिली आहे का, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांना ‘मला कोणी विचारत नाही’, असे म्हणून मिस्कील हास्य केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आघाडीने काँग्रेसला जागा दिली तर काँग्रेसकडून नाही, तर अपक्ष निवडणूक लढणार, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यांना भाजप व राष्ट्रवादीने ऑफर दिली, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्याबाबत बोलताना विखे-पाटील यांनी ऑफरचे खंडन केले. ते म्हणाले की, मला कोणी विचारत नाही. त्यामुळे ऑफर देण्याचा विषयसुद्धा येत नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली.

ते म्हणाले की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माजी तीन वर्षांपासून तयारी सुरू आहे. मी निवडणूक लढवणार आहे. माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे जरी मला थांब म्हटले, तरीही मी निवडणूक लढविण्यावर ती ठाम आहे. माझा निर्णय मी घेतलेला आहे. घराणेशाहीच्या जीवावर कोणीही मतदान करत नाही. त्यामुळे मी गेल्या तीन वर्षांपासून नगर दक्षिणेत लोकसंपर्क तयार करून लोकांमध्ये जाऊन त्याचे प्रश्न आणि अडचणी समजावून घेत आहे. माझी वजील किंवा आई नव्हे तर माझ्या ताकदीवर निवडणूक लढविणार येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us