उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्वातंत्र्यवीर सावकरांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल मत व्यक्त करत असताना म्हणले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व अन्य काही गोष्टींमध्ये सावरकरांचे काहीएक योगदान आहेच. ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळं त्यावरून गैरसमज निर्माण करण्याचं कारण नाही.

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. अजित पवारांनी विधानभेच्या कामकाजासाठी जाताना माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली. ते बोलत असताना म्हणाले चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही. गेल्या ३० वर्षांत मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही.

त्याचबरोबर ते म्हणाले, विरोधकांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण सत्ताधारी म्हणून सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पडावं असा आमचा प्रयत्न असतो. शेवटी सभागृह हे नियमाप्रमाणं चालतं. अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घ्यावी लागतात. एखादा विषय ऐनवेळी चर्चेला घ्यायचा निर्णय त्यांचा असतो. त्यानुसार तो घेतला जातो.

You might also like