‘कार्यकर्ता हे पद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही’, भाजप नेते सुशिलकुमार मोदींचे Twit

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन – जेडीयुचे सर्वेसर्वा नितीश कुमार (JD(U) chief Nitish Kumar) यांच्या गळ्यात पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (Chief Minister of Bihar) म्हणून शपथ घेतील. तर, भाजप नेते सुशील कुमार मोदी ( Sushil Kumar Modi) हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची( deputy chief minister) शपथ घेणार आहेत. मोदी याआधीच्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय झाला. सुशील कुमार मोदींनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

सुशील कुमार मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपा आणि संघ परिवाराने गेल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मला जेवढ दिले आहे. तेवढ इतर कोणाला दिले असेल. यापुढेही जी जबाबदारी मिळेल ती स्विकारेन. कार्यकर्त्याच पद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, असे ट्विट मोदींनी केले आहे. त्यांच्या या ट्विटचा नेमका काय अर्थ घ्यायचा असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण, कार्यकर्ता हे पद माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्रीपदी त्यांना संधी मिळेल, की नवा चेहरा येईल हे लवकरच स्पष्ट होईल.

सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर जेडीयू आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात नितीश कुमार हेच एनडीए सरकारचे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, उपमुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, अद्यापही निश्चित न झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळात याआधी काम केलेल्या अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.