काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणीच तयार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणी तयार नाही अशी गंभीर परिस्थिती काँग्रेस आघाडीवर आली आहे. वसंतदादा पाटलांच्या सांगलीची जागा स्वाभिमानीला द्यायची दयनीय अवस्था काँग्रेसवर आली आहे. त्यामुळे निवडणूक होणार आणि आम्हीच जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आणि निकाल फक्त औपचारिकता राहिली आहे असे म्हणले आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडले. वसंतदादांची सांगली स्वाभिमानीला द्यावी लागली. मागे वंचितला चार जागा देण्यासाठी तयार झाले होते. अशा काँग्रेसच्या धोरणावरून त्यांना पराभव मान्य झाला आहे हे सिद्ध होते असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढण्यासाठी तयार नव्हते मात्र त्यांना पक्षाने निवडणूक लढायला भाग पडले.अशा यांच्या राजकीय हालचालींची मोठी यादी आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयुष्यभर काँग्रेस शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हणले तीच स्वाभिमानी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणार आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे नाव नघेता त्यांना लगावला आहे. काँग्रेस मित्रपक्षांना जागा वाटण्याच्या बहाण्याने स्वतः काही जागा लढणार आहे कि नाही असा प्रश्न निर्माण होतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.