येथील ३०० मतदान केंद्रांवर फिरकला नाही एकही मतदार

श्रीनगर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. देशात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. परंतु जम्मू काश्मीरमध्ये मात्र दहशतवाद्यांच्या धमकीचा प्रभाव काही ठिकाणी दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील ३०० मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही. येथे केवळ १२. ४६ टक्के मतदान झाले.

दहशतवाद्यांच्या धमकीचा परिणाम
जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अनंतनागमध्ये २.३८ टक्के तर पुलवामामध्ये शून्य टक्के मतदान झाले. पुलवामा मध्ये एका मतदान केंद्राबाहेर ग्रेनेड हल्लादेखील करण्यात आला. त्याचा परिणाम येथे दिसला आहे. अनंतनाग आणि लडाख या ठिकाणांचाही समावेश आहे.

मतदान टक्केवारी घटली
अनंतनाग संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. येथे ३ ऱ्या, ४ थ्या, ५ व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र या टप्प्यांमध्ये येथील मतदानाची टक्केवारी दरवेळी घसरत गेली. २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी येथे १२. ४६ टक्के मतदान झालं. तर २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात येथे ८.७२ टक्के मतदान झालं. सोमवारी पाचव्या टप्प्यात तर केवळ २. ३८ टक्के मतदान झालं. त्यामुळे येथे मतदानाची आकडेवारी घडत गेल्याचे दिसते.