Video : ‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही’; रामदेव बाबांचा ‘तो’ Video समाज माध्यमांवर Viral

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी एक आक्षेपार्ह विधान केलं होत. यावरून भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) कडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. सध्या आणखी एक रामदेव बाबा यांचा व्हिडियो समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यांच्या प्रसारित व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे त्यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. या टिकेवरून IMA हे आक्रमक होत, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. यावरून स्वतः रामदेव बाबा यांनी सर्वत्र टीका होऊ लागल्याने अखेर त्यांनी माघारी घेतलं आहे.

रामदेव बाबा यांना समाज माध्यमांवर ट्रॉल केले आहे. सध्या रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानाचा अर्थात कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरी असतो, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता., असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.