सुशांतला देण्यात आली नव्हती कोणतीही ‘विषारी’ गोष्ट, फॉरेन्सीक रिपोर्टमधून मिळाली महत्वाची माहिती

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी जसजशी पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. यात सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, अशा बर्‍याच वृत्तांत सुशांतसिंग राजपूतसोबत काहीतरी घडले असून लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बाबतीत कलिना फोरेंसिक लॅबकडून टॉक्सिकोलॉजी, सायबर, लिझिचर मार्क, नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉशचा अहवाल आला आहे. अहवालानुसार सुशांतच्या मृतदेहावर अशी कोणतीही खून नाही ज्यामुळे त्याच्या हत्येच्या दिशेने इशारा मिळेल. नेल सॅम्पलिंग अहवालात कोणत्याही झटापटी किंवा खेचण्याच्या खुणा आढळल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरील पांढरे डाग त्याच्या लाळेचे होते. जे आत्महत्येनंतर तोंडातून फेस म्हणून बाहेर पडले आणि कपड्यांवर ड्राय झाले. अहवालात असे म्हटले आहे की, ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची खूण नाही.

स्टमक वॉश अहवालात याची पुष्टी झाली की, सुशांतला कोणतेही विष किंवा विषारी वस्तू दिली गेली नव्हती. त्याचे पोट पूर्णपणे रिकामे होते आणि आत्महत्येनंतर शरीरातून पेस्टही बाहेर आली. त्याच वेळी, लीजिचार मार्कमध्येही दुखापत किंवा भांडणाची कोणतीही खूण आढळली नाही. त्याच वेळी व्हिसेरा अहवालात असेही दिसून आले की सुशांतचा मृत्यू फाशीने गुदमरल्यामुळे झाला. दरम्यान, हा फॉरेन्सिक अहवाल मुंबई पोलिस सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील दाखल केला गेला आहे.