10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्षाचा पेच सुटून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या तिन्ही पक्षातील खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे बिनखात्याचे मंत्री म्हणून बसण्याची वेळ सहा मंत्र्यांवर आली आहे. तसेच मंत्र्यांच्या स्टाफशीही नेमणूक झाली नाही. त्यामुळे कार्यालयीन कामात अडथळे आले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होऊन 10 दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफची नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना देखील अद्याप खात्यांचं वाटप झालेलं नाही. त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही रखडल्या आहेत. सरकार स्थापन करण्यास झालेला विलंब यात सव्वा दोन महिन्यांचा कालावधी गेला आहे. या काळातील अनेक फाईल्स मंत्रालयात मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात अद्याप नव्या सरकारच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे अनेक कामं रखडली आहेत.

नागपूर अधिवेशनाला केवळ आठवडा उरला असतानाही खातेवाटप न झाल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Visit : Policenama.com

You might also like