PAK मध्ये ‘आशिया’ कप खेळणार नाही ‘टीम इंडिया’ : BCCI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने आशिया कपचे आयोजन केले आहे त्यात भाग घेण्याबाबत कोणतीही शंका नाही परंतु भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआयने सांगितले की, आशिया कपचे स्थळ तटस्थ असल पाहिजे. या वर्षीच आशिया चषकला सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी – 20 विश्व कपच्या तयारीसाठी आशिया चषक महत्वाचा मानला जात आहे. बीसीसीआयच्या एका सिनिअर अधिकाऱ्याने सांगितले की, निमंत्रणाचा काही विषय नाही परंतु हे केवळ तटस्थ खेळण्याबाबत आहे. कारण भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही.

या वर्षी पाकिस्तानकडे याची जबाबदारी आहे ही समस्या नाही तर हा चषक ज्या ठिकाणी होणार आहे त्या स्थळाचा प्रश्न आहे. सध्या ज्या प्रकारचे वातावरण आहे त्यानुसार आम्हाला एखादे तटस्थ ठिकाण हवे आहे अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली. जर भारताशिवाय आशिया कप होणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही मात्र भारताने या मध्ये हिस्सा घ्यावा असे वाटत असेल तर ही मालिका पाकिस्तानमध्ये होता काम नये अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

2018 मध्ये देखील भारताकडे याचे नेतृत्व होते मात्र पाकिस्तानला व्हिसाबाबत समस्या असल्यामुळे याची सर्व सूत्रे बीसीसीआयने हातामध्ये घेऊन ही मालिका सर्वसांठी तटस्थ असलेल्या युएई मध्ये भरवली होती. पाकिस्तानने देखील याबाबत विचार करावा असे सांगण्यात येत आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध तितकेशे चांगले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दोनीही देशातील राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापून आहे त्यामुळे अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानचा दौरा करू शकणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा