मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त : शिवसेनेची वचनपुर्ती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. यात तब्बल 18 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज झालेल्या या बैठकीत 500 चौरस फूटापर्यंतच्या मालमत्तेला करातून सुट देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. शिवसेनेने मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं करमुक्त करण्याचं आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता पूर्ण करण्यात आलं आहे.
आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाखो प्रकल्पबधितांना दिलासा देणाऱ्या स्वयंपुनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान  शिवसेनेने मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं करमुक्त करण्याचं आश्वासन दिले होते. शिवसेनेच्या या मागणीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देत मंजुरी दिली आहे.
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी 500 चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. जेव्हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/AUThackeray/status/1103990002210480128
दरम्यान आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “वचनपूर्ती !!! मालमत्ता कर मुक्त मुंबईकर ! 500 sq ft पर्यंत असणाऱ्या घरांना आता मालमत्ता कर नाही ! शिवसेनेची वचनपूर्ती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार !” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले.