Facebook आणि Twitter ‘अकाऊंट’ला ‘आधार’कार्ड लिंक करावं लागणार ? संसदेत मोदी सरकारनं मांडली ‘भूमिका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की आधार सोशल मिडिया प्रोफाइलला जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सोशल मिडिया अकाऊंट आधार कार्डला लिंक करण्याची याचिका रद्दबातल ठरवली होती.

सोशल मिडिया आधार कार्डला लिंक करण्याचे प्रकरण बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. यामागे दावा केला जातो की यामुळे फेक न्यूज आणि पेड न्यूजला लगाम लावता येईल. परंतू सर्वोच्च न्यायलायने पहिल्यांदाच या संबंधित दाखल झालेली एक याचिका रद्दबातल ठरवली.

भाजप नेता आणि वकील अश्विनी कुमार उपाध्यय यांच्याकडून दाखल याचिकेत सांगितले की आधारने सोशल मिडिया अकाऊंट जोडल्याने डुप्लीकेट, फेक आणि खोट्या अकाऊंटवर लगाम लावता येईल.

सर्वोच्च न्यायालयात झाली सुनावणी –
याआधी फेसबूक, ट्विटरसह सोशल मिडिया प्लॅटफॉर्मला आधारला लिंक करण्याप्रकरणी झालेल्या एका सुनावणीत न्यायालयाने सांगितले की आम्ही ऐकले आहे की सरकार सोशल मिडिया लिंक करण्यासंबंधित काही मार्गदर्शक तत्व घेऊन येत आहे. हे खूप महत्वाचे आहे. परंतू परिणामांचा देखील विचार केला पाहिजे. इंटरनेट वाइल्ड वेस्ट प्रमाणे आहे.

Visit :  Policenama.com