सरकारचा नवा नियम ! इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, मिळणार नवीन सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रिक वाहनां ( electric car ) ना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा जारी केला आहे, ज्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हीकल्सच्या (BOV) नोंदणी प्रमाणपत्रसाठी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट – RC), त्याच्या नूतनीकरणासाठी आणि नवीन रजिस्ट्रेशन मार्कच्या असाईन्मेंटसाठी जे शुल्क आकारले जाते त्यावर सूट देण्याचा प्रस्ताव प्रस्ताव आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक मसुदा जारी केला आहे, ज्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हीकल्सच्या (BOV) नोंदणी प्रमाणपत्रसाठी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट – RC), त्याच्या नूतनीकरणासाठी आणि नवीन इलेक्ट्रिक वाहनां( electric car ) साठी  रजिस्ट्रेशन मार्कच्या असाईन्मेंटसाठी जे शुल्क आकारले जाते त्यावर सूट देण्याचा प्रस्ताव प्रस्ताव आहे.

नवीन इलेक्ट्रिक वाहन ( electric car )  खरेदी केल्यावर, त्याच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा रिनिव्हलवर कोणतीही फी आकारली जाणार नाही.
तथापि, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ८१ मध्ये एक ओळ जोडली जाणार आहे.
याशिवाय याप्रकरणात अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
याबद्दल अधिक माहिती अद्याप येणे बाकी आहे.
या अधिसूचनेत नमूद केले आहे की नियम 2 (यू) मध्ये परिभाषित केल्यानुसार बॅटरी ऑपरेटेड व्हीकल्ससाठी या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यास किंवा नूतनीकरणासाठी फी आणि नवीन नोंदणी चिन्ह निश्चित (रजिस्ट्रेशन मार्क) करण्यास सूट देण्यात येईल.
मंत्रालयाने अशा वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) म्हटले आहे की,
यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळेल.

विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची किंमतदेखील कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी बनविण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो आणि इलेक्ट्रिक वाहनांना जास्त मागणी नसल्यामुळे कोणतीही कंपनी आत्ताच इलेक्ट्रिक व्हीकल बॅटरी बनविण्यात गुंतवणूक करू इच्छित नाही. आपण सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली तर भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी खूप वाढली आहे, हे लक्षात येईल. अशा परिस्थितीत हा नियम लागू झाल्यास अधिकाधिक ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करु शकतील. यासह, मागणीदेखील वाढेल. तसेच मॅन्युफॅक्चरर्सना भारतात बॅटरी बनवण्यास प्रोत्साहन मिळेल, इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल.

‘नागिन-3’ फेम पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मोदी सरकार LIC बाबत घेणार मोठा निर्णय ! मेगा IPO संदर्भातील हालचालींना वेग

राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊतांचे सूचक वक्तव्य