तिकिट ‘कॅन्सल’ करण्यासाठी रेल्वेनं बदलला ‘हा’ खास नियम, आता नाही TDR ची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे रेल्वेचे काऊंटर तिकिट आहे, तर ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा रद्द करू शकता. ही पद्धतही खुप सोपी आहे आणि रिफंड घेण्यासाठी तिकिट डिपॉझिट रिसिप्ट (टीडीआर) सुद्धा बनवण्याची गरज नाही. आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन) च्या वेबसाईटवरून काऊंटर तिकिट रद्द करण्याची सुविधा सुरू केली आहे.

तिकिट रद्द करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगिन करा. यानंतर काऊंटर तिकिट कॅन्सलेशन ऑपशनवर जाऊन ट्रेन नंबर आणि पीएनआर नंबर भरा. यावर क्लिक करताच तिकिट बुक करतेवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी भरताच तिकिटाची माहिती मोबाईल स्क्रीनवर दिसेल. व्हेरीफाय केल्यानंतर कॅन्सलेशन आणि पूर्ण भाडे परत मिळवण्यासाठीचा मेसेज मोबाईलवर येईल. जेव्हा आरक्षण काऊंटर उघडेल, तेव्हा मोबाईलवरील मेसेज दाखवून आणि रेल्वे तिकिट देऊन पूर्ण पैसे मिळवू शकता.

प्रवासाच्या तारखेच्या सहा महिन्यापर्यंत प्रवासी रिफंड घेऊ शकतात. आतापर्यंत तिकिट कॅन्सल केल्यानंतर टीडीआर बनवणे बंधनकारक होते. मात्र, आता नव्या नियमामुळे लोकांची धावपळ कमी होणार आहे. एनआयआरचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, काऊंटर तिकिट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशाजवळ तिकिट बुक करतानाचा रजिस्टर मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याच नंबरवर ओटीपी येईल.