Aadhaar व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून घरी बसल्या करा ‘DL’ चं नुतणीकर, अधिसूचना जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी किंवा त्या संबंधित कामासाठी अनेकदा आरटीओच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र, आता ही कामे आपण घरबसल्या करू शकतो. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 4 मार्च रोजी आधार पडताळणीद्वारे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस सुरू केली आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे आपल्याला यापुढे आरटीओमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले की, पोर्टलद्वारे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस मिळविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आधार पडताळणी करावी लागेल. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर आधार एनरोलमेंट आयडी स्लिप दाखवून ते ही सुविधा घेऊ शकतात.

आधार पडताळणीद्वारे या सुविधांचा मिळणार लाभ :
– कोणत्याही मोटार वाहनाच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज
– एनओसीसाठी नोंदणी प्रमाणपत्र अर्ज
– लर्निंग लायसन्स
– परवान्यामधील वाहन श्रेणी सरेंडर करणे
– डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स
– ड्रायव्हिंग लायसन्स अ‍ॅड्रेसमध्ये नोंदणी प्रमाणपत्र
– आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट देणे
– पूर्णपणे बनलेल्या बॉडीवाल्या वाहनांची नोंदणी
– डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज
– नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदलल्याची सूचना
– मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या नोंदणीसाठी अर्ज
– डिप्लोमेटिक ऑफिसर (मुत्सद्दी अधिकारी) च्या मोटार वाहन नोंदणीसाठी अर्ज
– मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या मोटार वाहनासाठी नवीन रजिस्ट्रेशन मार्कच्या असाइनमेंटसाठी अर्ज
– हायर पर्चेस अग्रीमेंटचे समर्थन
– ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, ज्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक नसते
– मोटार वाहनांच्या मालकीच्या हस्तांतरणाची नोटीस