नो सेल्फी विथ गोट, आदित्यनाथांचे बकरी ईदनिमित्त आदेश

लखनऊ : वृत्तसंस्था

बुधवारी देशभरात बकरी ईद साजरी होत असताना उत्तर प्रदेशात मात्र उघड्यावर प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात सक्त बंधने आणण्यात आली आहेत. तसेच राज्यात बकरी व तत्सम प्राण्यांचा बळी देताना सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यावरही बंदी आणण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’440794a1-a5f8-11e8-b4fd-55474507c953′]
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकारी आणि प्रशासनांना यासंदर्भात आदेश दिले. प्राण्यांचा बळी उघड्यावर देऊ नये तसेच रक्त गटारांमध्ये मिसळू देऊ नये, असे आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये प्राण्यांचे रक्त आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बकरी ईदनिमित्त राज्यातील वीज पुरवठा व पाणीपुरवठा अखंडीत ठेवण्याचे तसेच कायदा व सुव्यस्था राखण्याचे आदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीसांनी राज्यभर बंदी असलेल्या प्राण्यांचे बळी दिले जाऊ नयेत यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
[amazon_link asins=’B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49923165-a5f8-11e8-ab40-1b9f276fb7a0′]

मागील काही वर्षांपासून बकरी ईदनिमित्त प्राण्यांचा बळी देण्यापूर्वी आणि नंतर सेल्फी काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यासंदर्भात इटवाहमधील हॉटेल व्यावसायिक खुर्शिद अहमत यांनी सांगितले की, इस्लामनुसार कुर्बानी ही पडद्याच्या आत दिली पाहिजे. तसेच सेल्फीसारख्या प्रकारांना तर काहीच स्थान नाही.