पुणे जिल्हा न्यायालयात सोशल डिस्टंसिगचा ‘गोंधळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असून. पुण्यातही कोरोना रुग्ण आढळून आले आहे. असे असताना सुद्धा जिल्हा न्यायालयाच्या (District Court) ठिकाणी सोशल डिस्टंसिगचा गोंधळ उडाला आहे. कोर्टाच्या परिसरात भरपूर गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर कोर्टात जाणाऱ्या लोंकाची तपासणी करण्याच्या सुविधाही अपुऱ्या असताना दिसत आहे.

शहरातील कोर्टाच्या परिसरात लोक अनेक तंबाखुजन्य पदार्थ खाऊन पिचकाऱ्या मारताना दिसत आहे. यामुळे परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना काळात कोर्टाचे कार्य बंद झाल्यामुळे अनेक प्रलंबित खटले मागे राहिल्यामुळे आता खटले कोर्टात चालवले असल्याने अधिक प्रमाणात वकिल, पक्षकार आणि पोलीस यांची गर्दी होताना दिसते. तर दुसरेकडे आरोपी आणि नातेवाईकांचीही न्यायालयात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर कोर्टाच्या ठिकाणी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर मागील वर्षी कारवाईची मोहीम आखली होती. आणि मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले होते. तसेच २ पोलिसांवरही कारवाई केली होती. त्यामुळे काही प्रमाण कमी झाले होते.

तसेच, पुणे बार असोसिएशनचे वकील सतीश मुळीक म्हणाले, हाय कोर्टाच्या निर्देशानुसार कोर्टाचे कामकाज सुरु केले आहे. पोलिसांकडून वॉरंट जारी करण्यात आला तर पक्षकारांना न्यायालयात यावे लागते. अधिक गर्दी ही आरोपीसोबत येणाऱ्या नागरिकांची आहे. बिनाकामाचे कोर्टामध्ये येऊ नका असे सांगितले आहे. तर वकिलांनीही गर्दी करू नये असे सांगण्यात आले आहे. असे वकील मुळीक यांनी म्हटले आहे.