विराट कोहलीचे काय होणार ? भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत BCCIनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता बीसीसीआय कडक पावले उचलणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा याला एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते अशी चर्चा सगळीकडे रंगत आहे. त्याचबरोबर विराट कोहली यांच्याकडे कसोटी सामन्यांचे कर्णधारपद तसेच ठेवले जाऊ शकते अशीही चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे.

मात्र याबाबत बीसीसीआय रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेणार असल्याचे समजते.
परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार असून क्रिकेटच्या तीनही प्रकारातील कर्णधारपद त्याच्याकडेच ठेवले जाणार आहे. रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर रविवारी होणाऱ्या बैठकीत सर्व अफवांना पूर्णविराम दिला जाईल. असं देखील या सूत्राने सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर रविवारी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड देखील केली जाणार आहे.

कोहलीचे मत विचारात घेणार नाही

यावेळी प्रशिक्षक पदाच्या निवडीत कोहलीचे मत विचारात घेतले जाणार नाही. २०१७ मध्ये रवी शास्त्री यांच्या निवडीवेळी बीसीसीआयने विराट कोहली याला विचारले होते. मात्र यावेळी त्याला विचारले जाणार नाही. यावेळी संपूर्ण निर्णय भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे घेणार असून त्यावर प्रशासकीय समिती शेवटचा निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त