CAA आणि NRC ला समर्थन नाही, घुसखोरांविरुद्ध मोर्चा : राज ठकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनामध्ये पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राज यांनी सीएए आणि एनआरसीला पाठिंबा आहे असे बोलले जात होते. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची आज (मंगळवार) कृष्णकुंजवर बैठक घेतली.

कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना नव्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरासन करताना मोर्चा हा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनासाठी नाही. त्यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मोर्चा हा घुसघोरांविरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकितून स्पष्ट केल्याचे बोलले जातंय. दरम्यान, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रंगशारदा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारीच्या आयोजित मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.