मंत्रालयातील दालन क्रमांक 602 ची ‘दहशत’, बसायला मंत्री देखील घाबरतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकारच्या इतक्या दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी विधानसभेच्या मैदानांत पार पडला. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. याशिवाय तिन्ही पक्षातील नेत्यांनीही या नव्या सरकारच्या मंत्रीपदी शपथ घेतली. त्यांनतर आता, कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी देण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबईतील मंत्रालयाच्या आवारात सर्व मंत्र्यांना कार्यालय देण्याचे कामही सुरू झाले आहे. परंतु, मंत्रालयाच्या इमारतीत एक केबिनदेखील असेदेखील आहे, ज्यामध्ये कोणताही मंत्री बसायला तयार नाही.

केबिन क्रमांक ६०२ चा दरारा :
मिळालेल्या माहितीनुसार, केबिन क्रमांक ६०२ मुख्यमंत्री कार्यालयाच्या अगदी समोर सहाव्या मजल्यावर आहे. पण, तीन हजार चौरस फूट भागात असणाऱ्या या केबिनमध्ये कोणत्याही मंत्र्याला बसण्याची इच्छा नाही. पूर्वी हे कार्यालय महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे पॉवर सेंटर मानले जात असे. पूर्वी मुख्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव इथे बसत असत, पण आता प्रत्येकजण तिथे जाण्यास नकार देत आहे. यावेळीसुद्धा हे केबिन कोणालाही देण्यात आलेले नाही. कारण आहे अंधश्रद्धा.

अनलकी आहे केबिन :
असे म्हणतात की हे केबिन महाराष्ट्रातील नेत्यांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या केबिनमध्ये बसलेल्या तीन राज्यमंत्रीना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कोणी हरले तर कोणी मरण पावते. असे म्हटले जाते की, सोमवारी अजितदादांनीही हे केबिन घेण्यास नकार दिला.

२०१४ मध्ये भाजपाचे सरकार स्थापनेनंतर हे केबिन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. दोन वर्षांनंतर खडसे एका घोटाळ्यात अडकले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे केबिन देण्यात आले. केवळ दोन वर्षांत मे २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. हे केबिन सुमारे एक वर्ष रिकामे राहिले. त्यांनतर २०१९ मध्ये भाजप नेते अनिल बोंड यांना हे केबिन देण्यात आले, पण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून कोणताही नेता हे केबिन घ्यायला तयार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/