नोकरी गेल्यासही ‘नो-टेन्शन’ ! मोदी सरकारकडून 2 वर्ष मिळणार आर्थिक मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : खासगी क्षेत्रात नोकरदारांवर सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नोकरी गमवावी लागते. नोकरी नसली तर समोर मोठं आर्थिक संकट निर्माण होतं आणि हा प्रसंग खूप लोकांसोबत घडताना आपण उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.

मात्र आता चिंतेचं कारण नाही, कारण कुठल्याही नोकरदारांवर नोकरी गमवण्याची वेळ आल्यास या परिस्थितीत मोदी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. अचानक नोकरी गमवणा-यांना मोदी सरकारकडून दोन वर्ष म्हणजेच २४ महिने आर्थिक मदत केली जाणार आहे. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कर्मचार्‍यांना ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ अंतर्गत सरकारकडून ही मदत केली जाणार आहे. ईएसआयसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

ईएसआयसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, रोजगाराच्या अनैच्छिक नुकसानीमुळे किंवा रोजगारदम्यान आलेल्या दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ईएसआयसी २४ महिन्यांच्या कालावधीसाठी मासिक रोख रक्कम भरुन घेते. या योजनेच्या लाभार्थ्यांना नोकरी गमवण्याची वेळ आली तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचा-यांना अर्ज करावा लागणार आहे. ईएसआयसी वेबसाईटवर यासंबंधित अधिक माहिती उपलब्ध असून अर्ज ही उपलब्ध आहेत. त्यानंतर हा अर्ज भरुन ईएसआयसीच्या शाखांमध्ये हा अर्ज जमा करु शकता. वरील प्रोसिजर पूर्ण केल्यास नोकरदारावर नोकरी सोडण्याची वेळ आली तर तो लाभार्थी होऊ शकतो.

शाखांमध्ये अर्ज जमा करताना यासोबत २० रुपयांचे नॉन ज्यूडिशियल पेपरवर नोटरीचे अॅफेडेविट करावा लागणार आहे. त्यामध्ये एबी-१ पासून एबी-४ चा फॉर्म जमा करावा लागणार आहे. तसेच यासंबंधित ऑनलाईन सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी ईएसआयसीच्या अधिकृत वेबसाईटला www.esic.nic.in नक्की भेट द्या. या योजनेचा लाभ कर्मचा-यांना एकदाच मिळणार आहे.

तसेच ईएसआयसीच्या सुपर स्पेशिलिटी ट्रीटमेंटच्या नियमातही मोठे बदल करण्यात आले असून यात महत्वाचा बदल म्हणजे दोन वर्ष नोकरी करण्याची अट जी ठेवण्यात आली होती ती अट आता सहा महिने करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी नोकरदारांना या बदलांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आता फक्त सहा महिने नोकरी असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ईएसआयसी विमाधारकांवर नोकरी गमवण्याची वेळ आल्यास त्यांना २४ महिने आर्थिक मदत मिळणार आहे. एकूणच खाजगी नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Visit : Policenama.com