शिवाजीनगरमध्ये ‘पाणीबाणी’ ! पाणी नाही तर मत नाही, ‘या’ कॉलनीतील नागरिक रस्त्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तीनच दिवसांपूर्वी डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यावर आपटे रस्ता परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. तर काल मध्यरात्री रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केले. स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास राहिलेला नाही त्यांना मतदान का करावे असा प्रश्न उपस्थित करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे विशेष असे की शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे या प्रभागातील नगरसेवकही आहेत.

डेक्कन जिमखाना परिसरात मागिल वर्षभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी होणाऱ्या पाणी पुरावठयामुळे नागरिक वैतागलेले आहेत. हा परिसर उच्चभ्रू ची वसाहत म्हणून ओळखला जात असून वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. येथील रेव्हेन्यू सोसायटी तील नागरिकांनी तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली याच प्रभागात असलेल्या महापौर बंगल्यावर पाण्यासाठी मोर्चा काढला होता.

त्यावेळी देखील महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान त्यावेळी धरणातच पाणी कमी असल्याने कपात करावी लागत असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे कारण सांगण्यात आले होते.

Visit : Policenama.com