पुण्यातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद …!

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा केंद्र आणि  पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे ,त्यामुळे शुक्रावार  (दि . ७) डिसेंबर रोजी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवारी ‘(दि ८) रोजी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे.

या पंपिंग स्टेशनची देखभाल आणि दुरुस्ती 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर-पंपिंग), रॉ वॉटर, एसएनडीटी या जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत; तसेच लष्कर जलकेंद्रात महावितरणतर्फे विद्युतविषयक कामे करण्यात येणार असल्याने या जलकेंद्रातून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केले आहे.

कोणत्या भागात बंद राहणार पाणीपुरवठा 

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४३, कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.

एसएनडीटी विभाग :
प्रभात रस्ता, एरंडवणा गावठाण, पटवर्धनबाग, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, करिष्मा सोसायटी, चतुःशृंगी परिसर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, रेव्हेन्यू कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, शिवाजी हाउसिंग सोसायटी, वडारवाडी, पांडवनगर, भांडारकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता इत्यादी.

लष्कर जलकेंद्र :

लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, रेसकोर्स, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी