Lockdown मुळं जगणं झालंय अवघड ! वेब सीरिज अन् मॉडलिंग करणार्‍या 5 मुलींची ‘त्या’ धंद्यातून सूटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम नसल्याने जगणे अवघड झाले आहे. याचाच फायदा घेत भोजपुरी सिनेमे, वेब सीरीज आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचा धक्कदायक प्रकार मुंबईतील मीरा रोड परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी या तरुणींची सुका केली असून दोन दलालांना अटक केली आहे.

मॉडेल असलेल्या या तरुणींवर लॉकडाऊन लागल्यामुळे रोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती. काम नसल्यामुळे या तरुणींची आर्थिक परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. दोन्ही दलालांनी पैशांचे आमिष कामाच्या शोधता असलेल्या या तरुणींचा फायदा घेत देहव्यापार करण्यास भाग पाडले. एका खबऱ्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय झोनचे डिसीपी अमित काळे यांच्या टीमने एस के स्टोन पोलीस स्टेशनजवळील एका लॉजच्या सापळा रचला. दोन्ही दलालांकडे एक बनावट ग्राहक पाठवला. दोघांमध्ये व्यवहार झाला. या दलालांनी त्याला स्टोन पोलीस स्टेशनजवळ असलेल्या लॉजमध्ये बोलावले होते. पोलीस आधीपासूनच तेथे डबा धरून बसले होते. ज्यावेळी हे दलाल ५ तरुणींना घेऊन लॉजवर पोहोचले तेव्हा पोलिसांनी दोन्ही दलालांना ताब्यात घेतले. या दोघांवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.