मोदींनी मला मिडीयापासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय, अभिजित यांचं ‘मिश्किल’ उत्तर (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थशास्त्रातील 2019 च्या नोबेलचे मानकरी ठरलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी मला मीडियापासून सावध राहण्यास सांगितलं असून मीडिया तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल, अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली.

नरेंद्र मोदी यांच्या भेटीविषयी माहिती देताना अभिजित बॅनर्जी म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी याविषयी विनोदाने मला सांगितलंही आहे की, माध्यम प्रतिनिधी तुम्हाला मोदीविरोधी बोलण्यास भाग पाडतील. त्यांच्याशी आज माझी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सुरुवातीलाच त्यांनी हसत-हसत मला मीडियापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही माझ्याविरोधात वक्तव्य करावं म्हणून मीडिया प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं. ‘

नोबेल पारितोषिक मिळवल्यानंतर विविध व्यासपीठांवर मुलाखती देताना बॅनर्जी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. सरकारच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून त्यांना ट्रोलही केले होते.

कोलकाता येथे जन्मलेले अभिजीत बॅनर्जी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. सध्या ते एमआयटीमध्ये फोर्ड फाऊंडेशन आंतरराष्ट्रीय प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अभिजीत यांनी कोलकातामधील साऊथ पॉईंट स्कूल आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले असून 1981 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये बीएसची पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून 1983 मध्ये अर्थशास्त्र विषयात एमए केले. त्यानंतर 1988 मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली.

Visit : Policenama.com

 

You might also like