गर्भश्रीमंतांवर जास्तीचा ‘टॅक्स’ लावला पाहिजे : नोबेल विजेता अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोबेल पारितोषिक विजेते थोर अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाबद्दल कोणतेही भविष्यवाणी करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बॅनर्जी आणि डफ्लो यास “Quite Economics” म्हणतात. अर्थशास्त्रातील नोबल जिंकणारी ही पहिली जोडगोळी असून प्रोफेसर अभिजित बॅनर्जी आणि एस्तेर डफ्लो यांच्या म्हणण्यानुसार अधिक श्रीमंत लोकांवर जास्त कर लावला गेला पाहिजे.

श्रीमंतांवर अधिक कर लावण्यात यावा
अभिजीत बॅनर्जी यांनी संपत्ती कराची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, भारतात संपत्ती कर लादणे योग्य आहे. कारण लोकांकडे मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपत्ती कर लादणे हे योग्यच आहे.

मागणी वाढवण्यासंदर्भात बॅनर्जी यांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधांवर जास्त खर्च केला पाहिजे, जेणेकरून रोजगार वाढेल. भारताचा विचार केला तर पायाभूत सुविधा आणि उत्पन्न वाढ यांमध्ये संबंध दिसून येतो.

डफ्लो म्हणाले, ‘हे त्या हत्तीच्या गोष्टीप्रमाणे आहे, ज्यात आपण गेल्या तीन दशकांतील गरीब लोकांच्या उत्पन्नाकडे लक्ष दिले तर आपल्याला कळेल की त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. हा हत्तीचा मागील भाग आहे. जर आपण श्रीमंत लोकांना पाहिले तर समजते की त्यांचे उत्पन्न देखील वाढलेले असते. ही हत्तीची सोंड आहे. म्हणजेच हे दोन वेगवेगळी विश्व आहेत. या दोघांमध्ये राहणाऱ्याला सगळ्यात जास्त फटका बसत असतो.’ डफ्लो म्हणाले की भविष्यात गरज ही आहे की, गरिबांचा फायदा जास्त झाला पाहिजे आणि त्यांना हा फायदा सतत मिळतच राहावा कारण ते खूप गरीब आहेत.

ते म्हणाले, याची सुरुवात आपण संपत्ती करापासून करू शकतो. जास्त उत्पन्न असणार्‍या लोकांवर अधिक कर आकारला जावा. तसेच याद्वारे गरिबांमध्ये त्या रकमेचे योग्य ते वितरण झाले पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/