JNU मध्ये शिकलेले अभिजीत बॅनर्जी, त्यांची पत्नी डफॅलो आणि मायकेल क्रॅमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

स्टाॅकहोम : वृत्तसंस्था – यंदाचं अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक अभिजीत बॅनर्जी, त्यांची पत्नी डफॅलो आणि मायकेल क्रॅमर यांना संयुक्तपणे जाहीर झाले आहे. जागतिक दारिद्र्य कमी करण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन देण्यासाठी तिघांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कोलकाता येथे जन्मलेले अभिजीत बॅनर्जी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. सध्या ते एमआयटीमध्ये फोर्ड फाऊंडेशन आंतरराष्ट्रीय प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. बॅनर्जी हे एस्टर डुफलो आणि सेंधिल मुल्लईनाथन यांच्यासमवेत अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अ‍ॅक्शन लॅबचे सह-संस्थापक आहेत. तसेच ते इनोव्हेशन ऑफ पॉवर्टी अ‍ॅक्शन आणि कन्सोर्टियम फॉर फायनान्शिअल सिस्टम्स अँड पॉवर्टीचे सदस्य देखिल आहेत.

अभिजीत यांनी कोलकातामधील साऊथ पॉईंट स्कूल आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले असून 1981 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये बीएसची पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून 1983 मध्ये अर्थशास्त्र विषयात एमए केले. त्यानंतर 1988 मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचा विषय ‘एसेज इन इंनफॉर्मेशन इकोनॉमिक्स’ होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like