नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचं निधन

लंडन : वृत्तसंथा 

प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. लंडनमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात व्ही. एस नायपॉल यांनी ३० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. 2001 मध्ये नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारही मिळाला होता.

[amazon_link asins=’B01D4EYNUG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8572c69-9df3-11e8-a7c5-5d6032b3fde8′]

नायपॉल यांचा जन्म कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदाद या देशात झाला होता. नायपॉल यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. आॅक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश साहित्याची पदवी घेतली होती. त्यांच्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीला १९७१ मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.

नायपॉल यांनी आपल्या कारकिर्दितील लिखाणामुळे त्यांना २० व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले. नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’ ‘दि इनिग्मा आॅफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्या खुप प्रसिद्ध झाल्या.