2021 मध्ये स्थिती होणार आणखी वाईट ! उपासमारीच्या प्रकरणांत होईल प्रचंड वाढ, WFP चा इशारा

नवी दिल्ली : जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (डब्ल्यूएफपी) प्रमुखांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र एजन्सीला मिळालेल्या नोबल शांती पुरस्काराने एजन्सीला हे बळ दिले आहे की, जागतिक नेत्यांना या गोष्टीसाठी सावाध करू शकतो की, पुढील वर्ष या वर्षाच्या तुलनेत आणखी खराब असेल. या दरम्यान जर अरबो डॉलरचे सहकार्य मिळाले नाही तर 2021 मध्ये उपासमारीची प्रकरणे प्रचंड वाढतील.

डब्ल्यूएफपीचे प्रमुख डेव्हीड बेस्ले यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, नॉर्वेची नोबल समिती ते कार्य पहात होती जे एजन्सी संघर्षामध्ये, आपत्तीमध्ये आणि शरणार्थींच्या शिबिरांमध्ये दररोज करते. लाखो उपाशी लोकांना जेवण पुरवण्यासाठी एजन्सी आपल्या कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात टाकते…सोबतच जगाला हा संदेश सुद्धा देते की, तेथे स्थिती आणखी खराब होत आहे… आता आणखी काम करण्याची गरज आहे.

बेस्ले यांनी मागील महिन्यात नोबल पुरस्काराबाबत म्हटले होते की, हा अतिशय योग्य वेळी मिळाला आहे. अमेरिकन निवडणूक आणि कोविड-19 महामारीच्या बातम्यांमुळे यास जास्त प्राधान्य मिळाले नाही. सोबतच जगभराचे लक्ष त्या समस्येकडे गेले नाही जिचा आम्ही सामना करत आहोत.

त्यांनी सुरक्षा परिषदेत एप्रिल महिन्यात व्यक्त केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली की, जग एकीकडे तर महामारीशी सामना करत आहे आणि ते उपासमारीसारख्या संकटाच्या तोंडावर सुद्धा उभे आहे. याशिवाय जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर स्थिती वाईट होऊ शकते.

त्यांनी म्हटले की, आम्ही यास 2020 मध्ये टाळण्यास यशस्वी ठरलो कारण जागतिक नेत्यांनी निधी दिला, पॅकेज दिले परंतु जो निधी 2020 मध्ये मिळाला तो 2021 मध्ये मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत, यासाठी आम्ही सतत नेत्यांशी याबाबत बोलत आहेत आणि त्यांना येणार्‍या काळात खराब होणार्‍या स्थितीबाबत अवगत करत आहोत.