नोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018 : मधुमेहींना प्रेरणा 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – डायबिटीज असाणाऱ्या व्यक्तींना दैनंदिन जीवन जगत असताना त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसे की, हे खाऊ नका ते खाऊ नका. व्यायाम करण्याचा नेहमी आग्रह धरला जातो. खूपच काळजी घेत जगावं लागतं. नेहमी शरीरातील शुगर मेंटेन ठेवावी लागते. अशी माणसे खूप बारीक सारीक गोष्टीबाबत काळजी घेताना दिसतात. दरम्यान जास्तीत जास्त वेळ त्यांचा यातच जातो अशात त्यांना इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देता येत नाही. मधुमेह आजार नाही आणि मर्यादाही नाही असे उदाहरण जगासमोर ठेवत ‘नोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018’ या भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आज म्हणजेच 8 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम सायंकाळी पुण्यात पार पडला.

रुग्णांची त्यांच्या उपचारा पलीकडे काळजी घेणे आणि रोजच्या खान्या पिण्याच्या आणि व्यायामाच्या सक्तीतून वेळ काढत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा उद्देश समोर ठेवत पुण्यातील नोबल हाॅस्पीटलने  ‘नोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. मागील वर्षीच्या दोन सहभागी महिलांनी मिसेस महाराष्ट्र 2018 आणि मिसेस पुणे 2018 हे पारितोषिकही पटकावले.

मागील वर्षी मिस डायब्युटी क्वीन 2017 या स्पर्धचे आयोजन करणयात आले होते. आणि याच्या यशानंतर आता  ‘नोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकन डायबेटीक असोसिएशनने दिलेल्या कल्पनेला अनुसरून  ‘नोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018’ ही स्पर्धा मधुमेहींसाठी आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षी हा कार्यक्रम नोबल हाॅस्पिटलने स्पर्धकांसाठी मोफत आयोजित केला होता. या कर्यक्रमाने मधुमेह हा आजार किंवा मर्यादा नाही हे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

ही स्पर्धा स्त्री, पुरूष, बालके व ज्येष्ट नागरिकांसोबत पुण्यातील मगरपट्टा सिटी येथील लक्ष्मी लाॅन्स येथे पार पडला. मोठ्या संख्येने नागिरक या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. तर अनेक तरुण तरूणींनी यात आपला सहभागही नोंदवला. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमासाठी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर  तसेच केनेडियन अभिनेत्री व लोकहित कार्यकर्ता मिस लिजा रे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षणही. त्यांच्या हस्ते प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या निवड समितीवर फॅशनच्या दुनियेतील तसेच शहरातील तज्ज्ञ डाॅक्टर्स होते.दरम्यान या स्पर्धेत अनेकांनी या आपल्या कलागुणांना वाव देत त्यांच्यातील कला सादर केल्या. काहींनी नृत्य कला सादर केली तर काहींनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. याशिवाय फॅशन शो चे ही आयोजन यात करण्यात आले होते. दोन महिने अथक परिश्रम घेत आज हा कार्यक्रम यशस्वीरीत्या उत्साहात पार पडला. आॅडिशन राऊंड, फिटनेस अॅण्ड वेलनेस राऊंड आणि ग्रुमिंग राऊंड अशा तीन भागांमध्ये हा क्रार्यक्रम विभागला गेला होता.

दरम्यान अनेक मोठ्या लोकांच्या उपस्थितीत नागरिकांच्या मोठ्या संख्येत हा  कार्यक्रम पार पडला. तेसच अनेक तरुण तरुणी मधुमेहींनी बाजूला सारत आपल्यातील कला सादर करत उपस्थितांचे मनोरंजन करत त्यांचे मनही जिंकले. तसेच त्यांचे हे सादरीकरण मधुमेहींसाठी प्रेरणादायी ठरले.