कौतुकास्पद ! अवघ्या 12 वर्षाच्या मुलीनं साठवलेल्या पैशातून 3 मजुरांना चक्क विमानानं पोहोचवलं ‘स्वगृही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाउनमुळे मूळ गावी परतणार्‍या लाखो मजुरांचे हाल होत आहेत.
मात्रा, याकाळात अनेक स्वखर्चाने मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम करीत आहेत. असेच कौतुकास्पद काम नोएडाच्या एका 12 वर्षांच्या मुलीने केले आहे. तिन साठवलेल्या पैशांतून तीन मजुरांना थेट विमानाने घरी पोहचविले आहे. निहारिका द्विेदी असे या मुलीचे नाव आहे.

निहारिका आठवीची विद्यार्थीनी असून तिने बचत केलेले जवळपास 48 हजार रुपये दान केले आहे. त्याद्वारे तीन मजुरांना विमानाने झारखंडमध्ये त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्या तीन प्रवाशांपैकी एक कर्करोगाने ग्रस्त आहे. लॉकडाउनमुळे पायी घरी जाताना मजूरांचे बातम्या बघताना त्रास पाहून निहारिका दुःखी होत होती. त्यामुळे तिने साठवलेल्या पैशातूना मजुरांची मदत करायची आहे असे जाहीर केले. एका मित्राकडून तीन मजुरांना झारखंडला जायचे असल्याची माहिती तिलाा मिळाली. त्यांच्यातील एक कर्करोगग्रस्त असल्याचेही समजले. त्यामुळे आम्ही त्यांच्या तिकीटाची व्यवस्था केली, अशी प्रतिक्रिया निहारिकाची आई सुरभी यांनी दिली.

तर, समाजाने आपल्याला काही दिले आहे, आणि आता या अडचणीच्या काळात समाजासाठी काहीतरी करावे ही आपली जबाबदारी आहे, असे निहारिका म्हणाली. निहारिकाच्या या कामाचे सोशल मीडियामध्ये भरभरून कौतुक केले जात आहे.