TikTok व्हिडीओला लाईक मिळाले नाहीत म्हणून तरूणानं केलं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील अनेक तरुणाईमध्ये टिकटॉकचे इतके वेड आहे की व्हिडिओसाठी आणि लाईक मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडात घडली आहे. तरुणाने टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नाही या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

टिकटॉक व्हिडिओ तयार कऱण्याचे वेड तरुणाईत प्रचंड आहे. याच वेडापायी नोएडात चांद मशिदीजवळ राहणार्‍या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव इकबाल असून त्याचं वय 18 वर्षे होते. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार इकबालला टिकटॉक व्हिडिओ तयार करण्याचा छंद होता. काही दिवसांपुर्वी त्याने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट केले होते. मात्र त्याला लाइक मिळत नव्हते. त्यामुळे मुलाला नैराश्य आले होते. तो नेहमीच त्रस्त दिसायचा आणि त्याच तणावामुळे मुलाने आत्महत्या केल्याचे इकबालच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांनी इकबालच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. 3 मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या या काळात लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे सर्वच व्यवहार बंद असल्याने आर्थिक संकटही उभा राहिले आहे. तर खूप दिवसांपासून घरात बसल्यामुळे काहींना नैराश्यानेही ग्रासले आहे. त्यामुळेच तरुणाने आत्महत्या केली आहे. प्राथमिक चौकशीत टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नव्हते म्हणून तरुणाने आत्महत्या केली आहे.