कवी गुलजार देहलवी यांची ‘कोरोना’वर मात

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. 94 वर्षीय कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना 1 जून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत नोएडा गौतम बुद्ध नगरचे डीएम सुहास एलवाय यांनी ट्वीटरवरून माहिती दिली.

डीएम सुहास एलवाय यांनी त्यांच्या ट्विटरवर 94 वर्षीय कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘94 वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात करणे ही माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आम्ही सर्वजण तुमच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.’ नोएडा गौतम बुद्ध नगर सेक्टर-26 मध्ये राहणारे ज्येष्ठ कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना शारदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते . त्यावेळी त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना तीन दिवसांनी आयसोलेशनच्या सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. हॉस्पिलटमधून डिस्चार्ज झाल्यानंतर कवी एम जुत्शी गुलजार देहलवी भावुक झाले होते. त्यांनी मेडिकल स्टाफचे आभार मानले. ते म्हणाले, ‘तुम्ही मला नवे जीवन दिले आहे. जेव्हा मी चालू-फिरू लागेन तेव्हा तुम्हाला सर्वांना जेवणासाठी घरी बोलवेन.’असे सांगिेतले आहे.