Noida Crime | पती गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, चप्पल लपवण्यास विसरला अन् पत्नीच्या तावडीत सापडला; पत्नीने केले असे काही..

नोएडा : वृत्तसंस्था – विवाहित असूनही बाहेर लफडे करणाऱ्यांची झोप उडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोएडाच्या (Noida Crime) दनकौर मध्ये घडला आहे. एका तरूणाला त्याच्या गर्लफ्रेंडला (girlfriend) भेटण्याच्या तिच्या घरी जाणे चांगलेच महागात पडले. विवाहित तरुण भल्या पहाटे आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. त्याच्या मागोमाग पत्नी देखील तिथे पोहचली. मात्र, त्याने केलेल्या एका चुकीमुळे तो रंगेहात सापडला अन् पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार नोएडाच्या (Noida Crime) दनकौर पोलीस ठाण्याच्या (Dankaur Police Station) हद्दीत घडला असून पत्नीने पती विरोधात तक्रार (FIR) दिली आहे.

 

दनकौर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर हा विवाहित तरुण राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची गर्लफ्रेंड राहते. ही गर्लफ्रेंड एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आहे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गुपचूप पत्नीला कळून न देता तिच्या घरी गेला.

पत्नीला जेंव्हा जाग आली तेव्हा पती घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. आपल्या पतीचे बाहेर लफडे असल्याची माहिती तिला समजली होती. त्यामुळे ति देखील पतीला न कळू देता त्याच्या मागोमाग गर्लफ्रेंडच्या घरी पोहचली. पत्नी आल्याचे पाहून पती बेडच्या खाली लपला. मात्र, तो आपली चप्पल (Slippers) लपवायला विसरला. पत्नीने बेडखालून पतीला बाहेर काढून धु धु धुतले. (Noida Crime)

 

दरम्यान, आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जागे झाले. पहाटे कसला गोंधळ आहे हे पाहण्यासाठी लोक जमा झाले.
तर एक महिला एका व्यक्तीला चोपत असल्याचे दिसले.
लोक जमा झाल्याचे पाहून पतीने पत्नीच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत तेथून काढता पाय घेतला.
पतीचे महिलेसोबत लफडे असल्याचे पत्नीला माहिती आहे.
अनेकवेळा तिने त्याबाबत आक्षेपही घेतला, मात्र त्याच्यात काही सुधारणा झाली नाही, असा आरोप पत्नीने केला आहे.

 

Web Title :- Noida Crime | husband went girlfriends house wife came slippers were seen under bed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने केलं लोकांना वेडं, गाण्याच्या व्हिडीओला 47 करोडहून अधिक Views

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

Shah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता ‘या’ गोष्टीवरून त्रस्त, तब्बल 19 वर्षानंतर केला खुलासा…