निर्भयाची पुनरावृत्ती ! मित्रांनीच केला सामुहिक बलात्कार अन् तरूणीला फेकलं हायवेवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोयडा येथील यमुना द्रुतगती महामार्गावरील जेवर भागात शुक्रवारी सायंकाळी मथुरा येथील मित्रांसमवेत जाणारी एक तरुणीसंशयास्पद अवस्थेत जखमी सापडली. तिला ग्रेटर नोएडा येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर रविवारी पहाटे दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात उपचार घेत असताना पीडितेने जीव सोडला. यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची पुरावृत्ती झाल्याचे आढळून आले आहे.

पीडित तरुणीच्या कुटूंबियांनी पीडितेच्या मित्रांवर सामूहिक बलात्कार आणि खुनाचा आरोप केला आहे. नोएडा सेक्टर -73 मध्ये असलेल्या खेड्यात 20 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह राहत होती. वडील कंपनीची कार चालवतात. आईसुद्धा एका खासगी कंपनीत नोकरी करते. त्याच वेळी पीडित तरुणी सेक्टर-64 मध्ये असलेल्या कंपनीत काम करत होती.

पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून श्याम आणि सचिन नावाच्या युवकावर नोएडा सेक्टर – 49 पोलीस ठाण्यात खून आणि सामूहिक बलात्कार आणि एससी – एसटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पीडित मुलगी रात्री उशिरा येणार होती मात्र त्या आधीच तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीला तिची मैत्रीण जेवर येथील टप्पलजवळ रस्त्यावरील अपघातात जखमी झाल्याचा फोन आला.त्यानंतर रात्री 11 वाजता कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले त्यावेळी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना समजले. डॉक्टरांनी तीला तातडीने जीबीटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला त्यानंतर रविवारी पहाटे चारच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा –