अगोदर गाडी विकली नंतर तिच डुप्लीकेट चावीने केली चोरी, आतापर्यंत 7 लोकांना लावला चूना

नोएडा : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये 28 वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ज्याने प्रथम आपली वापरलेली गाडी ई-कॉमर्स साइटवर विकली आणि नंतर तिच चोरी सुद्धा केली. आरोपीने डुप्लीकेट चावीद्वारे गाडी चोरी केली. आरोपीचे नाव मनोत्तम त्यागी आहे. तो मुळचा अमरोहाचा राहाणारा आहे. त्याने गाडीचे ठिकाण जाणून घेण्यासाठी तिच्यात जीपीएस डिव्हाइस लावले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यागीने मागील दोन वर्षात एकाच पद्धतीने किमा  न सात लोकांना चूना लावला आहे.

सेक्टर 24 पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस अधिकारी प्रभात दिक्षीत यांनी सांगितले की, याच वर्षात 3 मार्चला जीतू यादव नावाच्या व्यक्तीने वाहन चोरीची तक्रार दाखल केली होती. यादवने सागितले की, मला वापरलेली कार खरेदी करायची होती आणि त्याचवेळी वेबसाइटवर जाहीरात दिसली. मी वाहन विकणार्‍याशी संपर्क साधला आणि 2.60 लाख रुपयांत मारूती स्विफ्ट व्हीएक्सआयचा सौदा फिक्स केला. तेव्हा संशयीत सेक्टर 66 च्या ममूरामध्ये आला आणि गाडी दिली. मात्र, तो गाडीच्या रजिस्ट्रेशनचे कागद आणि दूसरी चावी घेऊन आला नव्हता.

पोलिसांनी सांगितले की, विक्रेत्याने यादवला सांगितले की, तो नंतर गाडीचे पेपर आणि दूसरी चावी पाठवून देईल. यासाठी त्याने 2.10 लाख रुपये दिले आणि उर्वरित 50 हजार कागद आणि चावी मिळाल्यानंतर देण्यास सांगितले. यादवने दुसर्‍या दिवशी सेक्टर 12 मध्ये आपल्या ऑफिसच्या बाहेर गाडी उभी केली असता ती चोरीला गेली. एसएचओने म्हटले की, पोलीसांना नंतर समजले की, गाडी ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये कुठेतरी आहे. पोलिसांनी जेव्हा वाहन पाहिले तेव्हा आरोपीला थांबायला सांगितले. तेव्हा पोलिसांना समजले की, गाडीचा नंबर सुद्धा बनावट आहे.

आरोपीने कबूल केले की, त्यानेच गाडी चोरली आहे, नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने जीपीएस लावल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, गाडी विकल्यानंतर तो जीपीएसच्या मदतीने पुन्हा चोरी करत असे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेली गाडी, दोन मोबाइल फोन, तीन बनावट आधार कार्ड, तीन पॅनकार्ड आणि 10,720 रुपये कॅश जप्त केली आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

You might also like