‘तासाभरात PM मोदींना गोळ्या घालून ठार करेन’, मध्यरात्री आलेल्या फोनमुळं हादरलं पोलिस स्टेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका व्यक्तीने पोलिसांना 100 क्रमांकावर फोन करून एक तासाच्या आत पंतप्रधान मोदींना गोळ्या घालून ठार करेन अशी धमकी दिली. या धमकीने पोलिसांत खळबळ उडाली होती. फोन ट्रॅक करून त्याला पोलिसांनी अटक केली. हरभजन सिंग असे त्याचे नाव आहे.

पोलीस त्याची चौकशी करत असताना तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले की, सोमवारी 112 वर फोन आला होता. एका तासाच्या आत पंतप्रधानांना गोळ्या घालेन, तसेच तसेच नोएडाला उडवून देण्याची धमकी दिली.
आरोपींने फोनवर शिवीगाळही केला. यानंतर हा फोन 112 मुख्यालय लखनऊ येथून नोएडा पोलिसांना तातडीने पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मामूरा गावातून हरभजन सिंग नावाच्या तरूणाला अटक केली. मुळचा हरियाणाचा असलेला हरभजन सध्या नोएडाच्या सेक्टर -66 मध्ये राहत होता.