दुर्देवी ! 8 स्ग्णालयांनी प्रेग्नंट महिलेला दाखल करून घेण्यास दिला नकार, महिलेचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. संंबंधित महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करत असतानाच आठ रुग्णालयांनी या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने तिची मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उच्च रक्तदाबामुळे श्वास घेण्यास महिलेला त्रास होत होता. या प्रकरणामध्ये आता गौतमबुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महिलेचे नाव निलम असे असून ती 30 वर्षांची होती. गाझियाबादमधील खोडा येथे राहणार्‍या महिलेचा पती विजेंद्र सिंह आणि भाऊ तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून धावपळ करत होते. या महिलेचा भाऊ शैलेंद्र सिंह याने दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या बहिणीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी फिरत होता. हे दोघेजण या महिलेला सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. मात्र तिला दाखल करुन घेण्यास सर्व रुग्णालयांनी नकार दिला.

त्यानंतर या दोघांनी रुग्णवाहिकेमधून या महिलेला इतर दोन रुग्णालयांमध्ये नेले होते. तिथेही तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. बेड उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आल्याचा आरोप शैलेंद्रने केला आहे. शिवालिक रुग्णालय, ईएसआय रुग्णालय, शारदा रुग्णालय, ग्रेटर नोएडामधील सरकारी रुग्णालय,जयपी रुग्णालय, गौतम बुद्ध नगरमधील फोर्टीस रुग्णालय, गाझियाबादमधील वैशाली येथील मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी निलमच्या पतीने आणि भावाने दिवसभर तिला घेऊन धावपळ केली.