Nokia चा 5 कॅमेऱ्यांचा ‘हा’ फोन झाला ‘एकदम’ स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकियाचा Nokia 9 Pureview हा स्मार्टफोन 15 हजार रुपायांनी स्वस्त झाला आहे. नोकियाच्या या फोनमध्ये एकूण सहा कॅमेरे आहेत. फोनमध्ये रियरमध्ये 5 कॅमेरे आहेत तर एक फ्रंटला कॅमेरा दिला आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे. नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर या फोनची किंमत आता 34 हजार 999 रुपये इतकी आहे. भारतात हा फोन लाँच झाला त्यावेळी या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी होती.

कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल 15 हजार रुपयांची कपात केली आहे. नोकियाने हा फोन गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारतात लाँच केला होता. यानंतर पहिल्यांदा नोकियाने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. नोकियाने कमी केलेली किंमत तात्पुरती आहे की, कायमस्वरुपी आहे. याविषयी कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

Nokia 9 Pureview ची खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये 5.99 इंचाचा क्वॉड एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये बॅकला पेंटा कॅमेऱ्याचा स्टअप दिला आहे. फोनच्या मागे 5 कॅमेरे दिले आहेत. हे सर्व कॅमेरे 12-12 मेगापिक्सलचे आहेत. या पैच कॅमेऱ्यापैकी 3 कॅमेरे मोनोक्रोम सेन्सर आणि 2 आरजीबी सेन्सर आहेत. कोणताही पिक्चर कॅप्चर करण्यासाठी फोनमध्ये सर्व सेन्सर एकत्र काम करतात.

सेल्फी प्रेमींसाठी फोनमध्ये फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये क्यूआय वायरलेल चार्जिंग सपोर्ट सह 3 हजार 320 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.