×
Homeताज्या बातम्या'नोकिया'चे 'BSNL' वर 800 कोटींचे 'कर्ज', 'बंद' करु शकतात 'सेवा'

‘नोकिया’चे ‘BSNL’ वर 800 कोटींचे ‘कर्ज’, ‘बंद’ करु शकतात ‘सेवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारताची सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL सध्या मोठ्या अडचणीत आहे. कंपनीवर स्मार्टफोन निर्माता कंपनीवर नोकियाचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ही थकबाकी परत न केल्यास तर नोकिया सेवा बंद करु शकते. या प्रकरणाशी कंपनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की आमच्यावर अत्यंत दबाव आहे. आम्हाला सांगण्यात येत आहे की आम्ही त्या सेवा बंद कराव्यात ज्या BSNL ला देण्यात येत आहेत. तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक महिन्यांपासून बीएसएनएल आणि सरकारकडे थकबाकीची रक्कम मागण्यासाठी पत्र लिहिले आहे परंतू परिस्थितीत आतापर्यंत कोणतेही बदल केले नाहीत.

BSNL वर ८०० कोटीचे कर्ज
मार्चमध्ये कंपनीने टेलिकॉम विभागने एक पत्र लिहून थकबाकीची मागणी केली आहे. परंतू नोकिया BSNL कडून ८०० कोटी रुपये वसूल करु शकली नाही. पत्रात सांगण्यात आले होती की BSNL ने थकबाकी जमा केली नाही तर सेवा बंद करण्यात येतील. फक्त नोकियाच नाहीच तर इतर कंपन्या देखील BSNL कडून वसूलीसाठी प्रयत्न करु शकले नाहीत. यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.

एक अशी वेळ होती जेव्हा दूरसंचार क्षेत्रात राज्य करणाऱ्या बीएसएनएलने देश भरात मोठ्या प्रमाणात ग्राहक होते. BSNL चे नेटवर्क देशभरात पसरले होते. आज देखील खासगी कंपन्या BSNL च्या माध्यमातून पुढे आल्या. कारण त्याचे स्वत:चे नेटवर्क अत्यंत कमी होते. परंतू आता खासगी कंपन्याच्या स्पर्धेत सरकारी टेलिकॉम कंपनी मात्र मागे पडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Must Read
Related News