खुशखबर ! खूपच स्वस्त झाले Nokia चे ‘हे’ 2 स्मार्टफोन, 48 मेगापिक्सल ‘कॅमेरा’ आणि दमदार ‘बॅटरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकियाने आपल्या दोन दमदार तीन कॅमेऱ्यावाल्या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये कपात केली आहे. ग्राहकांनी या दोनीही फोनला चांगली पसंती दिलेली आहे. मात्र तुम्ही जर अजूनपर्यंत खरेदी केलेली नसेल तर तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात मिळणार आहे. नव्या किमतीनुसार आता ग्राहक नोकिया 6.2 ला 12,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या फोनची किंमत जवळजवळ 3,500 रुपयांनी कामी करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नोकियाने 7.2 या फोनची किंमत दुसऱ्यांदा कमी केली आहे. हा फोन 18,599 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु आता तो केवळ 15,499 रुपयांमध्ये (4 जीबी + 64 जीबी) उपलब्ध झाला आहे. यामध्ये 6 जीबी + 64 जीबीवर 2,500 रुपयांच्या सवलतीच्या नंतर, ते 17,099 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

नोकिया 6.2 चे फीचर्स
6.3 इंच इतका फुल एचडी+ डिस्प्ले
3 जीबी रॅम + 32 जीबी मेंबरी आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेंबरी मध्ये उपलब्ध
ऑक्टा कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 636 SoC प्रोसेसर
गोरिला ग्लास सह येणाऱ्या HDR10 डिस्प्लेचा सपोर्ट.
16 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल और 8 मेगापिक्सलचा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप
16 मेगापिक्सलमध्ये एक प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलमध्ये डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलला वाइड ऐंगल लेंस देण्यात आली आहे.
सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
3,500mAh ची बॅटरी

नोकिया 7.2 चे फीचर्स
HDR सपोर्टसह 6.3 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
660 एसओसी प्रोसेसर
48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा तर बॅकसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
5 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे दोन आणखी कॅमेरे देण्यात आलेले आहेत.
फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
3,500 mAH बॅटरी या फोनमध्ये उपलब्ध असणार आहे.