Nokia भारतात ‘स्वस्त’ 5G ‘स्मार्टफोन’ आणण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल (Airtel) ने भारतात 5G ची कमर्शियल चाचणी केली आहे. रिलायन्स जिओने देखील यंदाच 5G लाँच करण्याचे सांगितले आहे. म्हणजेच आता एकामागून एक नवे 5G स्मार्टफोन पाहायला मिळतील. बजेट स्मार्टफोन भारतात जास्त विकले जात असल्याने कंपन्या येथे कमी किंमतीत 5G स्मार्टफोन बाजारात आणण्यास तयार आहेत.

फिनलँड कंपनी एचएमडी ग्लोबल (HMD Global) कडे नोकिया (Nokia) मोबाईल बनविण्याचे लायसन्स आहे. ही कंपनी आता भारतात बजेटमध्ये मिड-रेंजचे 5G स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कंपनीने असे म्हटले आहे की ते भारताला आपला ग्लोबल एक्सपोर्ट हब बनवण्याची देखील तयारी करत आहेत. एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सनमीत कोचर यांनी कंपनीच्या 2021 च्या प्लॅनविषयी एका मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले की, कंपनी भारतीय बाजारपेठेनुसार फोन आणण्याची तयारी करत आहे.

ते म्हणाले की भारताकडे ते एक महत्वपूर्ण मार्केट म्हणून पाहतात. त्यांना भारतीय बाजारपेठेनुसार त्यांची उत्पादने आणायची आहेत. ते म्हणाले की, स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या दिशेने ते काम करत आहेत. जेणेकरून ते यावर्षी भारतात जास्तीत जास्त स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकतील.

सनमीत कोचर यांनी असे देखील म्हटले की ते आपल्या ग्राहकांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतील. ज्याद्वारे ते त्यांना अधिक चांगले फ्यूचर प्रूफ सॉफ्टवेअर प्रदान करण्याचा प्रयत्न करतील. ते भारताला कंपनीचे ग्लोबल एक्सपोर्ट हब बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. यासाठी कंपनीचे तज्ञ भारताचे बारकाईने परीक्षण करीत आहेत.

यापूर्वी अहवालात असे सांगितले गेले होते की एचएमडी ग्लोबल नोकिया 1.4 स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. या हँडसेटमध्ये 1.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 1GB रॅम आणि 16GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. Nokia 1.4 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 8MP चा असेल. तर सेकंडरी सेन्सर 2MP चा असेल. सेल्फीसाठी Nokia 1.4 मध्ये 5MP चा फ्रंट शूटर असेल. हा स्मार्टफोन 4,000mAh बॅटरीसह येईल. जी मायक्रो-यूएसबी 2.0 पोर्टवर चार्ज होईल.