साध्वींच्या ‘त्या’ वक्तव्यावर करकरेंचे मेहूणे म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शाहिद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. असे शब्द बोलल्यामुळे करकरेंचे मेहुणे किरण देव यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भाजपने साध्वींना उमेदवारी द्यायला नको होती असे किरण देव म्हणाले.

किरण देव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी द्यायला नको होती असे म्हणत देव यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील २६/११ च्या हल्यात शहिद झालेले हेमंत करकरे यांना मी शाप दिल्याने त्यांचा अंत झाला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केल्यानंतर हेमंत करकरेंनी माझा छळ केला असे साध्वी म्हणाल्या होत्या.

साध्वी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती. तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यावर निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी काँग्रेसला इशारा दिला.

शाप वैगरे ह्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही आणि राहिली गोष्ट करकरे यांनी साध्वी यांना छळले असल्याची, तर हे शक्यच नाही. जे लोक मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात तेच लोक अश्या गोष्टी करू शकतात. हेमंत करकरे हे सगळ्यांशी आदरपूर्वक वागायचे. ते छळ करुच शकत नाहीत, असे त्यांचे मेहुणे देव यांनी म्हंटले.